नागपूर येथे चर्मकार जागृतीचे पहिले राज्य अधिवेशन १९नोव्हेंबरला

188

चर्मकार बांधवांनी अधिवेशनात बहुसंख्येने सहभागी व्हावे

आयोजकांनी केले आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने चर्मकार समाज जागृती राज्यस्तरीय पहिले अधिवेशन दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ ला रविवारी रोजी, सकाळी ठिक १०-०० वाजता, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, ललीत कला भवन, चौक्स कॉलनी, इंदोरा चौक, नागपूर. येथे आयोजित केलेले आहे.

या अधिवेशनात चर्मकार समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे .

यावेळी अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम राहतील. तर उद्घाटक म्हणून अखिल भारतीय रविदासीया धर्मसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव वाघमारे राहतील.

सदर अधिवेशनाला महाराष्ट्रातील चमर्कार समाज बांधवानी व भगीनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विजयराज सेगेकर, राज्य उपाध्यक्ष, सुखदेव शेगोकार , राज्य व्यवस्थापन सचिव व खांन्देश प्रभारी शिवाजीराव मोरे , राज्य उपाध्यक्ष धनिराम बारीये, लक्ष्मण चेंदीया, सिद्धांत बर्वे, भोजराज सरोदे, गजानन ढोले,मंगेश पोटे,प्रदीप खूद्रे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.