राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाच्या जिल्हा सदस्यपदी विनायक पेलण
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक विनायक रघुनाथजी पेलने यांची राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा सदस्यपदी नुकतीच निवड केली आहे.
त्यांना राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजयराज सेगेकर यांच्या शुभहस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून विनायक पेलणे आपल्या व्यवसाया सोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.ते संत रविदास महाराज सेवा मंडळ आरमोरी येथे निष्काम सेवा देत असतात.तसेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.या समग्र कार्याची दखल सदर संघटनेने घेऊन त्यांना पद बहाल केले.
निवडीबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष नथ्थुजी अंडेलकर, नारायण वादीकर,राजू वादीकर, लक्ष्मण वादीकर, गुणवंत बावणे,केशव बावणे, दिलीप म्हशाखेत्री,नेपचंद पेलने, पुंडलिक पेलणे, हेमंत पेलने, किशोर पेलणे,किशन वाढई, रामदास वाढई, शालीकराम बन्सोड, किशोर वादिकर, अशोक बन्सोड जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना गडचिरोली जिल्हाध्यक्ष वामनराव जुआरे, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्कचे संपादक विलास गोंदोळे आदींनी अभिनंदन केले आहे.