अनुसूचित जाती व जमातीच्या योजनांचा घेणार आढावा
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.०८: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य अॅड.धर्मपाल मेश्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यासाठी दिनांक 09 व 10 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवस गडचिरोली दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी करण्यात आलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी मंजूर निधी, त्या निधीचा उपयोग, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या योजना व प्रत्यक्ष कामांची तपासणी करण्यात येणार आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी गडचिरोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन. त्यानंतर सकाळी 11 वाजता गडचिरोली नगरपरिषद, आरमोरी व देसाईगंज नगरपरिषद यांचा तसेच दुपारी 12.30 वाजता अहेरी, धानोरा, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा नगरपंचायत क्षेत्रातील योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये लाड पागे योजना, दलित वस्ती सुधार योजना, घरकुल योजना, अनुकंपा प्रकरणे, तसेच सफाई कर्मचारी टेंडर व इतर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.
दुपारी 2 वाजता सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यासमवेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व खर्चाचा आढावा. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद गडचिरोली, दुपारी 1 वा. जिल्हा क्रीडा विभाग, 2.30 वाजता आदिवासी विकास विभाग, दुपारी 3 वाजता महिला व बाल विकास विभाग आणि सायं 4 वाजता समाजकल्याण विभाग,यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी संबंधित विभागांकडून मागील पाच वर्षांचा खर्च, प्रगती अहवाल व योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
0000









