२९ जानेवारीला सर्व पक्षीय शोकसभा आरमोरी व देसाईगंजला

154

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी/देसाईगंज: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

त्याबद्दल दिनांक २९ जानेवारी २०२६ ला सकाळी ठीक ११:३० वाजता इंदिरा गांधी चौक आरमोरी येथे तर हुतात्मा स्मारक देसाईगंज येथे त्यांना सर्वपक्षीय आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सभेस सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी व देसाईगंज तर्फे करण्यात आले आहे.