सहकार पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित

108

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून २०२१ ते २०२४ या कालावधीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना गौरविण्यासाठी सहकार पुरस्कार वितरणाचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांसाठी इच्छुक संस्थानी १८ जुलैपर्यंत सबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पुरस्कारांतर्गत एकूण ४५ संस्थाना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये सहकार महर्षी पुरस्कार एक (संस्था १ लाख रुपये), सहकार भूषण पुरस्कार २१ संस्था ५१ हजार रुपये, आणि सहकार निष्ठ पुरस्कार २३ संस्था, २५ हजार रुपये यांचा समावेश आहे. सर्व पुरस्कारासोबत स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. संस्थांच्या निवडीसाठी मुल्यांकन निकष ठरविण्यात आले असून नोंदणी, वार्षिक सर्वसाधारण सभा, नफा-तोटा, थकबाकी, कायदेशीर कारवाई, लेखापरिक्षण, दोष दुरुस्ती अहवाल, निवडणूक आदी बाबींना ५० गुण, संस्था प्रकारानुसार विशेष निकषांना ३५ गुण, तर सहकार चळवळ, जनतेसाठी योगदान, सार्वजनिक व धर्मादाय मदत यांना २० गुण देण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली यांनी दिली आहे.

0000