PM JANMAN & DA JUGA : ४११ गावांमध्ये होणार संतृप्ती शिबीरांचे आयोजन

58

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१४: भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JUGA) अंतर्गत दिनांक 15 जून ते 30 जून 2025 या कालावधीत संपूर्ण देशभरात विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांतील 411 गावांमध्ये संतृप्ती शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरांचे उद्दिष्ट अनुसूचित जमातीच्या नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचविणे आणि या योजनांबाबत जनजागृती करणे हे आहे.

संतृप्ती शिबीरामध्ये विविध सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यात नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती मतदार ओळखपत्र काढणे व अद्ययावत करणे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळविणे, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड व सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी रेशन कार्ड बनविणे, बँक खाती उघडणे, वैयक्तिक वनहक्क दावे स्वीकारणे, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान कार्ड आणि किसान क्रेडीट कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज स्वीकारणे, वनधन विकास केंद्राशी संबंधित लाभमिळवणे, सौर ऊर्जा व स्वयंपाक गॅस कनेक्शन मिळविणे, विमा योजनांची नोंदणी, सिकलसेल व अॅनेमिया तपासणी (आरोग्य विभागामार्फत)आदींचा समावेश आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सशक्तीकरणाला गती देण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी केले आहे.

00000
फोटो साभार: गुगल

Previous articleनिधन वार्ता
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ