श्रीमती आयुषी सिंह व प्रकाश भांदककर बालस्नेही पुरस्काराने सन्मानित

70

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली, दि.०९: महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने गडचिरोली जिल्हातील उत्कृष्ट कार्य करणारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांना “बालस्नेही पुरस्कार” ३ मार्चला मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी मुंबई येथे माहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोर्डीकर, राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलिस अपर महासंचालक अश्वस्ती दोरजे, महिला व बाल विकास माजी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

————————————–
बालहक्क संरक्षण आणि उत्कृष्ट कार्याची दखल

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प श्रीमती आयुषी सिंह व महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध प्रभावी उपक्रम राबवले आहेत, त्यांनी विशेषतः तालुकास्तरीय बालसंगोपन योजना शिबिर प्रत्येक तहसील कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय परिसरात महिलांकरिता हिरकणी कक्ष यासंबंधी विविध उपक्रम प्रभावीपणे अंमलात आणले आहेत. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बालकांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगातर्फे हा पुरस्कार देण्यात आला.

नागपूर विभागातून गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, जिल्ह्यात बालकल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000