विविध शासकीय योजनांचा घेणार आढावा
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१५: राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य
धर्मपाल मेश्राम १६ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत.
श्री. धर्मपाल मेश्राम यांचा दौरा कार्यक्रम
दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 पर्यंत अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेसोबत आढावा व चर्चा. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या योजनांचा आढावा. दुपारी 1.00 ते 2.00 गोंडवाणा विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिव व प्रबंधकांसोबत शैक्षणिक विषयांवरील चर्चा. दुपारी 2.00 ते 3.00 राखीव. दुपारी 3.00 ते 4.30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत विविध योजनांबाबत चर्चा. दुपारी 4.30 ते 5.00 अनुसूचित जाती-जमातीच्या संघटनांसोबत चर्चा व निवेदने स्वीकारणे. रात्री गडचिरोली येथे मुक्काम. 17 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता गोंदियाकडे प्रयाण.









