रेल्वे संदर्भातील थांबा व इतर विषय मार्गी लावण्यासाठी दिले निवेदन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
नई दिल्ली येथे संसद भवनातील कार्यालयात रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांची चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेवराव किरसान यांनी भेट घेतली.तसेच सदर भेटीत गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील विविध समस्यांप्रती निवेदन देऊन अवगत केले.
निवेदनात वडसा ते गडचिरोली रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच छत्तीसगड ते गडचिरोली रेल्वे लाईन भविष्यात करण्याच्या अनुषंगाने नकाशा घेऊन चर्चा केली तसेच वडसा रेल्वे स्टेशनवर गाडी क्र. 22173 व 22174 जबलपूर ते चांदा फोर्ट व चांदा फोर्ट ते जबलपूरचा थांबा देण्याबाबत तसेच गाडी क्र. 07051 व 07052 हैद्राबाद ते रकसौल व रकसौल ते हैद्राबाद या रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याबाबत तसेच गाडी क्र. 12069 व 12070 रायगड ते गोंदिया व गोंदिया ते रायगड जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा थांबा आमगांव स्टेशन वर देण्याबाबत त्यांना सांगितले.
तसेच लेखी पत्रही खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिले.









