रायगड ते वैरागड (ता.आरमोरी,जिल्हा गडचिरोली)भेट देणारे पर्वतरोही सुबोध गांगुर्डे यांचे भावोद्गार
३६५दिवसात शिवरायांचे ३७० किल्ले केले सर
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
रायगड/गडचिरोली:साक्षात शिवछत्रपती यांचे पदस्पर्श माझ्या घरी लाभले व माझं घर पवित्र झालं. असे भावोद्गार काढले आहेत ३६५दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील ३७१किल्ले सर करण्याचा चंग बांधलेला व ३७०किल्ले चढाई करून पूर्ण केलेल्या तसेच विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्कला खलिता पाठविलेल्या त्या बहादुर पर्वतरोही व गडकिल्ले अभ्यासक सुबोध गांगुर्डे यांनी..
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन अश्या स्वराज्यातील 371 गड किल्यांची माती ही माती गोळा करून आणण्यापर्यंत च्या प्रवासा बद्दल आज थोडक्यात त्यांचे मनोगत…त्यांच्याच शब्दांत वाचूया….
रायगड जिल्यातील तालुक्याचे ठिकाण आणि दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगड यापासून काही किमी अंतरावर असलेलं रोहा या ठिकानी राहत असलेला महाराष्ट्र राज्यातील एक पर्वतारोही गेल्या 4 वर्ष पूर्वी माझ्या या पर्वतारोहन प्रवासाला सुरवात झाली. तिनं वर्षे हिमाचल मध्ये उंच उंच अश्या पर्वतांच्या कुशीत राहून एक स्वप्न पहिल होतं. ते स्वप्न म्हणजे मी ज्या माती मध्ये जन्म घेतला त्या माती चे अनंत उपकार आपल्या वर आहेत त्याची फेड करणं शक्य नाही; परंतु या शरीरात महाराष्ट्राचं जे सळसळत रक्त वाहत आहे, त्याचा उपयोग आपण आपल्या राष्ट्राचं वैभव वाढविण्यासाठी करून आपल जीवन सार्थकी लावू या विचाराणे बेभान होऊन एका सायकलचा आधार घेऊन मी निघालो; महाराष्ट्र मधील 370 गड किल्यांच्या प्रवासाला व याचं गड किल्यांची माती चा आशीर्वाद घेत ती पवित्र माती आपल्या कपाळी लावण्यासाठी…… तसं हे कार्य वाचायला खूपच सोपं आहे ;परंतु तुम्ही जर विचार केलात की तुम्हाला दिवसाला 140 ते 150 किमी अंतर सायकल वर कापायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला एक डोंगरी किल्ला सुद्धा चढून उतरायचा आहे, तर काय परिस्थिती होईल. तरी अजून सायकलचा रस्ता हा प्लेन असेल कि चढ उताराचा यावर मी आलोच नाही. 19,000 किमी अंतर दोनशे हुन अधिक गिरीदुर्ग त्यावर कोकणातील चढ उताराचे रस्ते, गावात कधी जेवण मिळालं तर कधी उपाशी झोपावं लागलं, कधी दिवस भर उपाशी पोटी सायकल चालवली कधी उपाशी पोटी गड चढलो वर्षे भर ऊन, पाऊस, थंडी या तिन्ही ऋतुची मार अंगावर झेलत जंगलातून एकटा प्रवास करत… त्या जंगलात अनेक प्राणी समोर आले हद्द तर तेव्हा झाली जेव्हा अक्षरशः अंगावर पट्टे असलेला वाघ डोळ्यांसमोर आला आणि मी माझा शेवट समजून देवाच नावं घेतलं; पण एवढा निडर प्राणी सुद्धा माझ्या अंगावर न येता त्याच्या रस्त्यावर निघून गेला. सगळ्यात मोठ आश्चर्य असे नं माहित असणारे प्राणी पक्षी पाहत 300 दिवसात 361 गड पूर्ण केले व शब्द दिला होता 365 दिवसात 371 किल्ले पूर्ण करेल आणि मी या सर्व विपरीत परिस्थितीत हार नं मानता शब्द पूर्ण केला. 370 वा दुर्ग श्रीमान रायगडच्या पायऱ्या माझ्या साथीदार सायकल ला घेऊन चढू लागलो… प्रत्येक पायरी चढताना एका वर्षात केलेल्या मेहनतीच हे फळ आज तुम्ही पाहताय… तुमच्या पैकी बऱ्याच लोकांसाठी ही फक्त माती असावी; पण माझ्या साठी हे माझ्या सात जन्माची पुण्याई म्हणजेच 371 किल्यांची माती आहे.अशा शब्दात आपला खडतर व रंजक प्रवास त्यांनी व्यक्त केला आहे.
_________________________
🌹🚩🙏🌹
शतशः अभिनंदन!
शिवरायांच्या शुरवीर मावळ्याचे..
पर्वतरोही व गडकिल्ले अभ्यासक सुबोध गांगुर्डे हे छत्रपती शिवरायांचे रायगड ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील सुप्रसिध्द किल्ल्याच्या भेटी करिता आरमोरी येथे भर पावसाळ्यात आले होते.वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी वैरागड येथे आरमोरीकर युवकांच्या मार्गदर्शनाखाली वैरागडचा गड सर केला.आरमोरी सिताबर्डी परिसरातील कास्तकार कॅफे मध्ये त्यांनी विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांची भेट घेतली.तसेच आरमोरी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर व युवा मंडळींचे आदरतिथ्य स्विकारून मुलाखत दिली.त्यावेळी त्यांनी सांगितले होते की,सर..मी३७१किल्ले सर केल्यानंतर व समस्त किल्ल्यांवरील माती गोळा करून शिवरायांची प्रतिमा तयार करणार आहे.किल्ले पूर्ण सर झाले की, आपणास व्हाट्सअप वर मेसेज रूपी खलिता पाठविणार असे सांगितले होते.अगदी ३६५दिवसात ३७१पैकी ३७०किल्ले पूर्णत्वास जाताच त्यांनी यशस्वीतेचा मेसेज धाडला.त्यामुळे मला अत्यानंद झाला आहे.त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला व सातत्यपूर्ण परिश्रमाला सलाम!🙏
✍️🎙️ विलास गोंदोळे
संपादक/प्रकाशक
विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क









