विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली – नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोलीच्या रानगर्भातील रानफुले या कवितेला वाहिलेल्या गृपवरुन सोमवार पासून राज्यस्तरीय ‘नाट्यश्री मासिक कविता स्पर्धा ची सुरुवात करण्यात आलेली आहे .
यापुर्वीही नाट्यश्रीच्या ‘रानगर्भ फुलत आहे’ या गृप वरुन वर्षभर आठवडी कविता स्पर्धा घेण्यात आल्या. व त्यातील पुरस्कृत ६० कवींना नाट्यश्रीच्या वार्षिक समारंभात आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या कवितेला उत्कृष्ट कविता म्हणून पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले होते.
यावेळी नाट्यश्रीने मासिक कविता स्पर्धा आयोजीत केली असून त्यात विजेत्या कवींना नाट्यश्री उत्कृष्ट कवी व कवितेला उत्कृष्ट कविता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी दर महिन्यात तीन उत्कृष्ट कवींची निवड करण्यात येऊन त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून नियमित सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा विनामुल्य असून केवळ कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासने हा संस्थेचा उद्देश आहे. झाडीपट्टीतील कवींना विशेष प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक कवींनी स्पर्धेचे नियम अटी व इतर माहितीसाठी स्पर्धा प्रमुख चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) व्हॉट्सॲप नंबर ९६२३६६३४३५ किंवा योगेश गोहणे (कविता विभाग प्रमुख) व्हॉट्सॲप नंबर ९४०२१२७२७३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
————–_——————








