विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
नागपूर(विदर्भ):”मैत्री कवीकट्टा कवीमनाचा” या साहित्य समूहाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच मोठ्या थाटामाटात संत्रानगरी नागपूर येथे संपन्न झाला. यानिमित्त कवी संमेलन, पुरस्कार वितरण सोहळा तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला.
या कार्यक्रमात तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथील प्रसिद्ध कवयित्री, लेखिका,समिक्षिका, परिक्षिका सौ.सुनिता आनंद तागवान यांना “काव्यरत्न पुरस्कार” देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराबद्दल साहित्य क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे तसेच सर्वच स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष अशोक कांबळे नागपूर हे होते. तर व्याखाते आणि मार्गदर्शक वैभव धर्माधिकारी पुणे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे तसेच कुरखेडा नगर सेविका सौ. प्राची धोंडणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन समूह संचालिका व संस्थापिका अल्का धोंडणे ,साखरे यांनी केले. यावेळी बहुसंख्येने प्रसिद्ध साहित्यिक, कवी, कवयित्री उपस्थित होते.








