विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : 1 डिसेंबर 2025, जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. आरोग्य विभागा मार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावर्षी जागतिक एड्स दिनाची थीम” Overcoming disruption, transforming the AIDS response – अडथळ्यांवर मात करू, एकजुटीनेएचआयव्ही/ एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू! ” या घोषवाक्य असुन या अतंर्गत 1 डिसेंबर ते 15 डिसेंबरपंधरवाडयात अति जोखीमचे गट/भाग/जागा/ठिकाण/स्थालांतरीत कामगाराच्या कामाच्या ठिकाणी मुख्यचौक, बाजार गर्दीचे ठिकाणी व्यापक जनजागृती करुन जिल्हा व तालुका स्तरावर मोहीम अधिक प्रभावीकरुन जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचून त्यांना एचआयव्ही तपासणी प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. याअनुषंगाने जिल्हा मुख्यालयासह तालुकास्तरावर जनजागृती सायकल/बाईक रॅली व प्रभात फेरी काढण्यातयेणार आहे. एचआयव्ही संसर्गित मुलासाठी चित्रकला स्पर्धा उत्कृष्ट काम करण्या-या कर्मचा-यांचा गौरव तसेच महाविद्यालय स्तरावर रेड रिबिन क्लबच्या (RRC) माध्यमातुन विविध जनजागृती स्पर्धा पोस्टर मेकिंग, सोशल पोस्ट मेकिंग, रांगोळी व चित्रकला स्पर्धा व पथनाट्य तसेच विविध महाविद्यालय, व शासकिय कार्यालयात व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असुन याद्वारे एचआयव्ही एड्स विषयी मुलभूत माहिती संसर्ग होण्याचे कारणे ,लक्षणे ,गैरसमज व प्रतिबंधात्मक उपाय, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र एकंदरीत आरोग्य विभागा अंतर्गत विविध स्तरावर देण्यात येणा-या सेवा सुविधाची माहिती प्रसार करण्याचा हेतु आहे. जेणे करुन प्रत्येक नागरिकास या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रामतंर्गत असलेलया सेवाचा लाभ घेता येईल.
—————————————-
दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता आयोजित सायकल रॅली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथुन कारगिल चौक परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली या ठिकाणी समारोप होणार आहे सदर प्रभात फेरीत स्थानिक सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबदल जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ माधुरी किलनाके यांनी आवाहन केले आहे.
0000









