पतंजली तर्फे गणपती उत्सवात नि:शुल्क योग शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन करावे

124

वीधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली): गणेशोत्सवाला लवकरच सुरूवात होत आहे.सदर गणेशोत्सवात योगशिक्षकांनी पतंजली तर्फे योग शिबीर आयोजित करावे, असे आवाहन पतंजली योगपीठ परिवारातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तर शहरातील प्रत्येक गल्लीत गणेश उत्सव साजरा होत असतो. योग शिबिर घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी माइक, व्यासपीठ व आसन व्यवस्था असते. पतंजली योगपीठ परिवार नांदेड शहरात व जिल्हाभर 101 ठिकाणी तर महाराष्ट्र पूर्वच्या 18 जिल्ह्यांमध्ये 1001 ठिकाणी योग शिबिरे लावण्याचा संकल्प केला आहे. सकाळी 5.00 ते 7.00 दरम्यान योग शिबिर घेण्यासाठी योग्य वेळ आहे, या वेळेत गणपती व्यवस्थापनात आरती वगैरे कार्यास योग शिबिरामुळे कोणतेही अडचण होत नाही. पतंजली योगपीठ परिवार सर्व गणेश उत्सव मंडळांना विनंती करते की आपण आपल्या गणपती पुढे रोज सकाळी पाच ते सात दिवसाचा योग शिबिराचे आयोजन करावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना योग शिबिराचा लाभ होईल. तसेच सर्व योग शिक्षकांनी आपण गणेश मंडळातील व्यवस्थापकाना भेटून शिबिराचे आयोजन करावे.असे आवाहन पतंजली योगपीठ परिवारातर्फे केले आहे.