आरमोरीत मोफत बालरोग व स्त्रीरोग तपासणी शिबिर ८ मार्चला 

70

तज्ज्ञ डाॅक्टरांची राहणार उपस्थिती

 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.७: येथील यश मेडिकल स्टोअर्स व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक ८ मार्च २०२५ रोजी,सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय (सरकारी दवाखानाचे समोर) आरमोरी येथील यश मेडिकलच्या बाजूला आयोजित करण्यात आले आहे.

 

 

सदर शिबिरात स्त्रीरोग व गरोदर माता तपासणी,प्रसूती पूर्व वा प्रसुती पश्चात तपासणी,गर्भाशयाचे आजार,मासिक पाळीची समस्या,गरोदर पनातील मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व उपचार,वंध्यत्व निवारण,गर्भ पिशवीला गाठ येणे,लहान मुलांचे सर्व आजार,बालदमा निदान व उपचार,मेंदूज्वर निदान वा उपचार,सर्दी ,ताप,खोकला आदी आजारांची तपासणी केली जाणार असून उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.राकेश डडमल, बालरोग तज्ज्ञ व जनरल फिजिझियन डॉ.श्रीकांत कावळे उपस्थित राहणार आहेत.

 

शिबिराला परिसरातील माता,भगिनी,बालगोपाल यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व आरोग्य तपासणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.