देसाईगंज येथे भव्य आरोग्य शिबीर २ फेब्रुवारीला

178

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

.देसाईगंज : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे ),नागरिक आरोग्य रक्षक संस्था, केयर क्लिनिक, अम्मा क्लिनिक, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने देसाईगंज कमलनगर येथील रफी अहेमद किडवाई मेमोरीयल हायस्कुल येथे भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबीर चे आयोजन दिनांक २ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये, रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसांचा ताप, किडनीचे आजार, हृदय रोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदय रोग, छातीत दुखणे, धाप लगणे, छातात धडधड, करणे इत्यादी,नेत्र रोग मोतिबिंदू शस्त्रक्रिया , तीरळेपणाइत्यादी.तसेच हायड्रोशील,हर्निया,अंगावरील गाठी, आतड्यांचे आजार मुतखडायचे आजार, पोटाचे आजार, गलगंड (थाॅयराईड)व स्त्री रोग,मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे, महिलांचे इतर आजार,बाल रोग हृदयाला छिद्र असणे, मतिमंद, मुलांच्या विकासा संबंधी, आजार तसेच कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार,अस्थीरोग, संधिवात, मणक्यात असणारी ग्याप, वाकलेले पाय, फ्रॅक्चर तसेच हदांचे सर्व आजार,त्वचा रोग खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वाचेचे सर्व रोग,श्वासन रोग,दमा, बरेच दिवसचा खोकला, तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे इत्यादी सर्व रोगाची तज्ञ् डॉक्टर कडून तपासणी व उपचार करण्यात येईल.

सदर शिबिरामध्ये निवड झालेल्या रुग्णांची हेल्प एज इंडियाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल, करिता या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन आयोजक लतीफ भाई शेख, राजेश गढरिया, नवेद पटेल, योगेश नेवारे, लतीफ रिजवी, मछिंद्र मुळे, अजमत खान, जावेद शेख आदिनी केले आहे.

Previous article🌹 जानेवारी (२०२५)!🌹
Next article🌹 जानेवारी (२०२५)!🌹
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ