विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंती निमित्त मोफत राज्यस्तरीय फिजोओथेरपी आरोग्य शिबीर आयोजन करण्यात येत आहे.सदर शिबिर जगदाळे मामा हाॅस्पिटलमध्ये दिनांक २५ व २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.सोलापूर जिल्हयात असे शिबिर प्रथमच होत आहे.
शिबिरामध्ये ऑपरेशन नंतरचे व्यायामोपचार, हातापायाला मुंग्या येणे, शीयटिका, स्पॉन्डिलेसिस, अर्धांगवायू, चेहऱ्याचा अर्धांगवायु.
सेरेबल पाल्सी,
पार्कींगसन्स, पोलीओ,
नस्कुलर डिस्ट्रॉफी, जी. बी. एस. सी. टी. इ. व्ही. टी. एच. आर. टी. के. आर.ए.सी.एल.पी.सी.एल, आरइएचएबी इत्यादी.,मानेचे आजार,मणक्याचे आजार,त्यांना ट्रेक्शन, मसल स्टीम्युलेटर,पराफीन वॅक्स अशा विविध उपचार पध्दतीने तपासणी करण्यात येणार आहे,याच बरोबर मानदुखी, खांदा दुखी, कोपरा दुखी, रिस्ट ड्रॉप, फुट ड्रॉप, पाठ दुखी, मणक्याचे आजार,कंबर दुखणे, गुडघे दुखणे, संधीवात
स्नायुंचे दुखणे,
प्लास्टर काढल्यानंतरचे व्यायाम,
खेळाडूंच्या दुखापती, सांध्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुर्नवसव,प्लास्टीक सर्जरी यावरील उपचाराची माहिती देणार आहेत.
या शिबीरामध्ये तज्ञ डॉक्टर्स डॉ.दीपा बासुंदे, डॉ. ऋषिकेश पोळ,डॉ.सौरभ झा,डॉ. शेख इर्शाद,डॉ.समृद्धी देशपांडे हे
मोफत तपासण्या करणार आहेत.
इच्छुकांनी या शिबीराचा जास्तीजास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.इर्शाद शेख व डॉ समृद्धी देशपांडे यांनी केले आहे.
नोंदणी व चौकशी विभाग
जगदाळे मामा हॉस्पिटल,बार्शी. नांव नोदणीसाठी संपर्क:- 8262084800 / 9322799183