विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) शाखा ब्रम्हपुरी व महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १०जानेवारी २०२४रोजी सकाळी १०ते २ वाजेपर्यंत महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी (बर्डी ) येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिरात निमा शाखा ब्रम्हपुरी व आरमोरी येथील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करणार आहेत.
सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी ०७१७७-२९९८९९,७५८८७९००२१,८९८२७५६९२६ या क्रमांकावर रूग्णांनी नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









