महात्मा ज्योतिबा फुले पुतळा अनावरण व समाज प्रबोधन

162

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती

विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती व मार्गदर्शन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील माळी समाज संघटना कासवीच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन व महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज दिनांक ३जानेवारी २०२४रोजी दुपारी ठीक १वाजता कासवी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागरी सहकारी बँक गडचिरोलीचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार हे राहणार आहेत.तर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते समारंभाचे उद्घाटन होणार आहे.सह उद्घाटक म्हणून रामदास मसराम,समता परिषदेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष भूषण खंडाते, कांग्रेसचे आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, तसेच मार्गदर्शक म्हणून आरमोरीचे पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सामाजिक कार्यकर्ते जयकुमार मेश्राम, विलास गोंदोळे मार्गदर्शन करणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष पवन नारनवरे,न.प.आरोग्य सभापती भारत बावनथडे, भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, नगरसेवक विलास पारधी, मिथुन मडावी, सदानंद कुथे,नंदु चंदेवार, गोविंदा भोयर,नंदु नाकतोडे, माजी जि.प.सदस्य लक्ष्मीताई मने, मनिषा दोनाडकर, माळी समाज आरमोरी तालुका अध्यक्ष रणजित बनकर, महिला तालुका अध्यक्ष प्रतिभा नंदरधने, सचिव सचदेव मोहुर्ले,संघटक गुरूदास बोरूले, सामाजिक कार्यकर्ते विभा बोभाटे, सुनीता तागवान, डॉ.प्रदीप खोब्रागडे, डॉ.निलकंठ मसराम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाला आरमोरी तालुक्यातील बहुसंख्य बांधवांनी उपस्थित राहावे व समाज प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळी समाज संघटना कासवीचे पदाधिकारी समस्त गुरनुले परिवार यांनी केले आहे.