🌹जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज 🙏
अभंग २
नये जरी तुज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल ।
येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥३॥
तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥४॥








