विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती
प्रबोधन, महारॅली
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना व सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपितामह ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिक्षक दिन सोहळा आज दिनांक २८नोव्हेंबर २०२३रोज मंगळवारी फुले दाम्पत्य प्रतिष्ठान,आय.टी.आय.चौक बायपास देवापूर एरिया गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अ.भा.माळी संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष भिमराज पात्रीकर राहणार आहेत.तर उद्घाटन सामाजिक विचारवंत डॉ.स्मिताताई मेहेत्रे करणार आहेत.तर विचारमंचावर मार्गदर्शक म्हणून सामाजिक विचारवंत प्रा.संजय मगर, डॉ.प्रेमकुमार खोब्रागडे प्रबोधनरूपी पुष्प गुंफणार आहेत.तर स्वागताध्यक्ष म्हणून माळी समाज संघटना जिल्हाध्यक्ष फुलचंद गुरनुले अतिथींचे स्वागत करणार आहेत.कार्यक्रमाला विविध तालुक्यातील संघटनेचे तालुकाध्यक्ष, तालुका संघटक, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानिमित्त सकाळी १०वाजता महारॅली निघणार आहे.तसेच १२वाजता प्रबोधन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
सदर कार्यक्रमाला सर्व समाजातील नागरिकांनी व माळी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना व समस्त आयोजक संघटनांचा वतीने करण्यात आले आहे.








