आदि कर्मयोगी अभियान: जिल्हा प्रशिक्षण / जिल्हा मास्टर ट्रेनर्स राज्यस्तरीय कार्यशाळा प्रशिक्षणाचे आयोजन

68

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.०४ सप्टेंबर : आदि कर्मयोगी अभियान राबविणेकरीता जिल्हा प्रशिक्षण / जिल्हा मास्टर ट्रेनर्स राज्यस्तरीय कार्यशाळा प्रशिक्षण घेण्याबाबत यापुर्वी ३० ऑगस्ट २०२५ रोजी गडचिरोली येथे बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीच्या अनुषंगाने चामोर्शी, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, व कोरची या ०७ तालुक्यातील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण ०४ सप्टेंबर २०२५ ते ०६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत (तीन दिवस) एकलव्य मॉडेल रेशिडेंशियल स्कुल गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.

तसेच अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुक्यांतील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण ०४ सप्टेंबर २०२५ ते ०६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत (तीन दिवस) एकलव्य मॉडेल रेशिडेंशियल स्कुल, अहेरी येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

दोन्ही ठिकाणच्या प्रशिक्षणाच्या स्थळी हजर राहणेकरीता अधिकारी/कर्मचारी यांना यापुर्वीच पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.

तेव्हा संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी आवर्जुन सदर प्रशिक्षणास उपस्थित रहावे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000