८ मार्चला नगर परिषदतर्फे विविध कार्यक्रम

214

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी,दि.६ मार्च : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 08 मार्च 2025 रोजी नगर परिषद आरमोरी कार्यालयाकडून शहरातील महिलांकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्यामध्ये सकाळी 08.30 वाजता आरमोरी शहरामध्ये महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सकाळी 10.30 वाजता पाककला स्पर्धा, वक्तृत्व व परिसंवाद, गीतगायन एकल नृत्य, समूह नृत्य व फॅशन शो इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धक महिलांना बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन राजीव भवन सभागृह बाजार पेठ आरमोरी येथे करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते होणार आहे.तर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी, उपजिल्हा रुग्णालय आरमोरीच्या वैद्यकीय अधीक्षक छाया उईके, पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे,अॅड.नर्गीस पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमास महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगर परिषद आरमोरीच्या मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे यांनी केलेले आहे.