मुलचेरा येथे सखी वन स्टॉप सेंटर योजनेची जनजागृती

92

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली,दि. 28: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत विविध योजना, फायदे यांची व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिध्दी होण्याकरीता दिनांक 23 जानेवारी 2025 ला शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेरा येथे 1:00 वाजता सखी वन स्टॉप सेंटर जनजागृती कार्यक्रम तथा बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाची दशकपूर्ती निमित्य शपथ देण्यात आली.

यावेळी श्रीराम महाकरकार सहा. शिक्षक, शहिद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, मुलचेरा ,बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रॉय बाल पर्यवेक्षिका दिनेश्वरी मेश्राम मुलचेरा आदी उपस्थित होते.

कौंटुबिक हिंसाचार या बाबत माहिती तथा बेटी बचाओ ; बेटी पढाओ ! ची शपथ पुरुषोत्तम मेश्राम, संरक्षण अधिकारी, मुलचेरा यांनी दिली. तसेच वन स्टॉप सेंटर योजना महिला हेल्पलाईन 181, घरगुती हिंसाचार कायदा 2005, स्त्री शक्ती पोर्टल, चाईल्ड हेल्पलाईन 1098, गुड डच बॅड टच याबाबत कु. प्रणाली सुर्वे केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी माहिती दिली.
उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लोमेश गेडाम सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी मदत केली.

0000