महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकांसह सहलीसाठी रवाना

359

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील महात्मा गांधी विद्यालयाची सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील सहल नागपूर येथे प्राचार्य साईनाथ अद्दलवार व सहलप्रमुख शिक्षक हेमंत निखारे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे रवाना झाली.

यावेळी सहलीच्या बसेसला शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विलास गोंदोळे यांनी हिरवी झेंडी दाखविली व सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांना पालकांच्या वतीने सुकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.सर्वांना मनोरंजनासोबतच स्व काळजी व इतर प्रासंगिक खबरदारी संदर्भात मार्गदर्शन केले.

एकूण सहा बसेस मध्ये जवळपास तीनशे आसनस्थ झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांना आपण पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे पदोपदी ऐकून घेत काळजी घेणार असे अभिवचन दिले.सर्वांना बाय बाय करीत नागपूर प्रवासाचा मार्ग धरला.

यावेळी शिक्षक पालक संघाचे आंबोणे ,सौ.लठ्ठे, दिवाकर ठाकरे,ओपाल मेश्राम,दखणे,कुंभारे, वनमाळी,भरणे,सौ.पुष्पा सपाटे, आरमोरी,डोंगरगाव,ठाणेगाव व इतर परिसरातील पालकवर्ग तसेच उपमुख्याध्यापक विरेंद्र गुंफावार, शिक्षक सुरपाम विद्यार्थ्यांसोबत सहलीसाठी निघालेले शिक्षक किशोर सहारे,हिवराज सयाम, प्रेम सयाम, सुनील चट्टे,चांभारे,रुपम पाचपांडे, शिक्षीका प्रिती धाईत,मावानी, मसराम आदी उपस्थित होते.