मान्यवरांची राहणार विशेष उपस्थिती
कलाकार मंडळींनी सहभागी होण्यासाठी करावी नोंदणी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
देसाईगंज (वडसा) जिल्हा गडचिरोली,दि.३ आॅक्टोंबर: गडचिरोली जिल्हा संगीत शिक्षक संघटना व ओम कलाकुंज कलाकार संघटना वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ व ६ आॅक्टोंबर 2024 रोज शनिवार व रविवारला गजानन महाराज मंदिर सभागृह वडसा येथे सांस्कृतिक कला संमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशीय सत्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान करणार आहेत .तर अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते रामदास मसराम राहणार आहेत .तर सहअध्यक्ष म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम व राष्ट्रीय काँग्रेस आदिवासी सेलचे प्रदेश सचिव डॉ.आशिष कोरेटी तसेच दीपप्रज्वलन काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व आलापल्लीचे विजुभाऊ खरवडे यांचे हस्ते होणार आहे.त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून म्हणून जिल्हा परिषद माजी सभापती नाना नाकाडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जीवन नाट,पंचायत समिती माजी सभापती परसराम टिकले, कांग्रेस नेते वामनराव सावसागडे, काँग्रेस नेत्या डॉ. शिलू चिमूरकर , माधुरी मडावी, माजी नगरसेवक हरीश मोटवानी , राजेंद्र बुल्ले माधव गावड ,नंदू नरोटे ,उद्योजक गणेश फापट ,राजीव रासेकर ,सहजाद शेख, उपसभापती नितीन राऊत, उद्योजक मनोहर डांगे, दिनेश कुर्जेकर, भास्कर डांगे, मनोज ढोरे, पिंकू बावणे, प्रकाश समर्थ, अरुण कुंभलवार ,अविनाश गेडाम, जमाल शेख, काँग्रेस नेते छगन शेडमाके ,गोपाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक नेते राहणार आहेत. यावेळी यावेळी आमदार कृष्णा गजबे यांचा सत्कार केला जाणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून नगरपरिषद देसाईगंज चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजू जेठानी ,जिल्हा परिषद माजी सभापती रोशनी पारधी, उद्योगपती आकाश अग्रवाल ,शहराध्यक्ष सचिन खरकाटे ,वासुदेव दुपारे, चेतनदास विधाते, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना ढोरे, वसंता दोनाडकर योगेश नाकतोडे आदींची उपस्थिती असणार आहे.
वृद्ध साहित्यिक कलाकार, जिल्ह्यातील वारकरी ,भजन, नाट्य, भारुड, दंडार ,खडीगंमत, नृत्य, लावणी, लोकसंगीत, लोकगीते व इतर पारंपारिक लोककला क्षेत्रात कलावंत म्हणून काम करणाऱ्या कलाकारांनी या संमेलनात आपल्या कला प्रदर्शित करावयाचे आहेत. तसेच सदर कलावंतांना आकर्षक बक्षिसे व सेवा मानपत्र देऊन त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तेव्हा आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सर्व कलावंतांनी दिनांक ४ आॅक्टोंबर २०२४ पर्यंत नोंदणी करून या कला संमेलनात
बहुसंख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा संगीत शिक्षक संघटना तथा ओम कलाकुंज कलाकार संघटना वडसा यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
————————————–
🧾कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक ५ आॅक्टोंबर २०२४
१) सकाळी १० वाजता- रॅली
२) दुपारी १२ वाजता-उद्घाटन समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम
३) दुपारी ४ ते रात्री १० वाजता पर्यंत -नियोजीत कार्यक्रम
दिनांक ६ऑक्टोंबर २०२४
सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत -नियोजीत कार्यक्रम व
बक्षिस वितरण समारंभ
प्रवेश फी
१)एकल- १०१ ₹
२)समुह -२५१ ₹
प्रवेशासाठी संपर्क खालील नंबरवर साधावा.
🤳८६६८८९४४४९
🤳 ९१४६४५३११८
—————————————-








