रक्षाबंधन उत्सव होणार साजरा
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): दरवर्षीप्रमाणे यंदाही बेरोजगार अंध समिती शाखा देसाईगंजच्या वतीने सर्वत्र सुरू असलेल्या रक्षाबंधन उत्सवाच्या पावन पर्वावर पंचायत समिती सभागृह आरमोरी येथे आज दिनांक २२ आॅगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता ‘अंध कलाकारांचा पंचरंगी ब्लाईंड म्युझिकल आॅर्केष्ट्रा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमात मुंबई, नागपूर, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील अंध दिव्यांग आपल्याकडे अंगी असलेल्या गायन,वादन, संचालन तसेच विविध कलांचे प्रदर्शन व रक्षाबंधन उत्सव करणार आहेत.
सदर कार्यक्रमास नागरिकांनी,दर्दीनी विशेष प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अजय दादगाये, उपाध्यक्ष सुभाष गेडाम, सचिव घनश्याम केवट व समस्त पदाधिकारी आदींनी केले आहे.