युवकांनो आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहा

135

प्राचार्य डी.के.मेश्राम यांचे प्रतिपादन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
ब्रम्हपुरी (जिल्हा चंद्रपूर): आज देश गंभीर परिस्थितीतून वाटचाल करीत आहे. देशात अराजकता , बेकारी,जातीयता, अंधश्रद्धा ,धार्मिक उन्माद ह्या बाबी राष्ट्रीय एकात्मता भंग करणाऱ्या असून ती तुमच्या समोर आव्हान ठरत आहेत तेव्हा ही आव्हाने पेलण्या करिता सजग आणि सज्ज राहा असे माजी प्राचार्य तथा दलीत मित्र डी.के. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

डॉ . बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ब्रम्हपुरी यांचे राष्ट्रीय सेवा योजना योजना शीबिराच्या समारोप प्रसंगी अड्याळ येथील विचार मंचावरून प्रा. डी.के . मेश्राम बोलत होते.

ते पुढे म्हणाले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून देशातील गावे, खेडे विकसित करण्या संबंधी भर दिले. कारण देश हा खेड्या खेड्यानी बनला आहे. खेड्याचा विकास म्हणजे देशाचा विकास असतो. महाराज म्हणतात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा; गाव भंगता येईल अवदशा विश्र्वा माझी !.हे सत्य आहे. आज खेडे ओसाड पडली आहेत .शहरे फुगून चालली आहेत .त्या मुळे शहरात अनेक समस्या निर्माण होत आहेत.त्याचा परिणाम सर्व समाज बांधवावरती होत आहे.

मंचावर उपस्थित असलेले अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजेश कांबळे यांनी सुद्धा युवकांना प्रबोधन केले. व जिद्द चिकाटी दृढ संकल्प करून प्रगती करा असे आवाहन केले. कारण विद्यार्थी हेच देश घडवणारे शिल्पकार आहेत असे त्यांनी सांगितले. मंचावरून मान्य वरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

रा.सो.यो. च्या शिबिराचे समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर जी. प.चे माझी सभापती तथा प्राचार्य डॉ.राजेश कांबळे तर प्रमुख पाहुणे दलीत मित्र माजी प्राचार्य डी.के .मेश्राम , अड्याळ ग्रा.प च्या सरपंच श्रीमती ताराबाई गाडेकर ,उपसरपंच नामदेव लांजेवार , ग्रा . प सदस्य विनोद वासनिक , प्रा कोसे,डॉ.स्निग्धा मॅडम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

रा .सो. यो .प्रमुख प्राध्यापक कोसे  यांनी संचालन करून शिबिराचे महत्त्व प्रस्तावनेतून सांगितले.

सदर शिबिरात कॉलेज चे युवावर्गानी सहभाग घेतला व समारोपीय कार्यक्रमाला गावातील महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .