पत्रकारदिनी झुंजाररावांचा यथोचित गौरव !

138

श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्काॅलरचा अभिनव उपक्रम

आरमोरीकर पत्रकारांनी आयोजकांचे मानले शतशः आभार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित श्रीमती वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्काॅलरच्या वतीने दोन दिवशीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव ‘एंजल बिट्स २०२३-२४’च्या निमित्ताने आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती प्रित्यर्थ(दिनांक ६जानेवारी)पत्रकार मंडळींचा शाल व श्रीफळ देऊन सहृदय यथोचित गौरव केला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे होते.तर सत्कारमूर्ती म्हणून दै. लोकमतचे पत्रकार विलास चिलबुले, महेंद्र रामटेके, देशोन्नतीचे रूपेश गजपुरे, तरूण भारतचे दौलत धोटे,सकाळचे प्रा.प्रशांत झिमटे, पुण्यनगरीचे आकाश चिलबुले, लोकशाही वार्ताचे अमरदीप मेश्राम, महासागरचे सुनील नंदनवार, नवभारतचे राजू गारोदे आदी पत्रकार व प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य नितीन कासार, पर्यवेक्षक किरण मांडवकर तसेच शालेय मंत्रीमंडळातील शाळा महानायक शिवम् काळबांधे,कु.सृष्टी कुथे उपस्थित होते.

सर्व प्रथमतः महापुरुष व संस्थेतील दिवंगत संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रतिमांसमोर दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर सर्व पत्रकार मंडळींचा शाल व श्रीफळ देऊन सहृदय यथोचित सत्कार शालेय व्यवस्थापनातील शिक्षक व कर्मचारीवृदांचे वतीने करण्यात आला.

पत्रकार मंडळी ही समाजाचा आरसा असतात.ते आपल्या लेखनातून सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्या निर्भीडपणे व्यक्त करत असतात.तळागाळातील जनतेचा आवाज शासनदरबारी मांडून त्यांना स्थायी स्वरूपाची उपाययोजना करण्यात मदत करीत असतात.अशा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार मित्रमंडळीचा पत्रकारदिनी सत्कार म्हणजे हा सुवर्णक्षण आहे.असे भावोद्गार आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य नितीन कासार यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना पत्रकार म्हणाले की, आद्यपत्रकार व मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी आमचा सत्कार हा आमच्या कार्यकाळातील अविस्मरणीय क्षण आहे.सत्कारामुळे आता आमची जबाबदारी दुप्पटीने वाढलेली आहे.समाजकल्याणाकरीता आमच्या लेखणीची धार कमी होऊ देणार नाही असे याप्रसंगी आश्वस्त केले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक अमित राऊत यांनी केले.तर आभार गुलनाज शेख यांनी मानले.

यशस्वीतेसाठी शिक्षक रविकांत मस्के, प्रीतम धोंडणे ,हेमंत खोब्रागडे, अक्षय आत्राम, संदीप गणवीर ,मंजिल गराडे, शैलेश उरकुडे ,सुनीता टिचकुले, नूतन शेंडे ,सविता पानसे ,नयीमा पठाण शितल कत्रे ,नीलिमा सोरते, नंदा लोणारे, निशा दडमल ,नंदा वनमाळी, स्नेहा सुखदेवे, प्रियंका मैंद ,पपीता राऊत ,ज्ञानेश्वरी टिचकुले, प्रीती सोरते ,ज्ञानेश्वरी शेंडे, मीनाक्षी कासार, शिवांगी राऊत ,ललिता भोयर, लक्ष्मी पटेल, प्राची देशपांडे, उज्वला राखडे ,डिंपल पराठे ,संगीता सुतसोनकर ,सुनिता डुंबरे ,सुषमा तुंगीडवार ,चंद्रकला भेडांरे आदींनी सहकार्य केले.