नागपूर येथे खोब्रागडे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला अभ्यास दौरा

114

जैवविविधता व अवकाशीय तंत्रज्ञानाचा जाणली सखोल माहिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील वैरागड येथील श्री. किसनराव खोब्रागडे ज्युनिअर कॉलेजच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य विवेक हलमारे यांच्या मार्गदर्शनात अभ्यासक्रमाचा वास्तविक अनुभूती म्हणून अभ्यासदौरा करण्याचे ठरविण्यात आले. त्याअंर्गत नागपूर जवळील गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय जैवप्राणी संग्रालय व अवकाशीय तंत्रज्ञानावर आधारित नागपूर स्थित रमण विज्ञान केंद्र तसेच विद्युत तंत्रज्ञान व स्थापत्य तंत्रज्ञानाचा चमत्कार मेट्रो ट्रेनची सफारी अभ्यास आयोजित करण्यात आला होता.

यावेळी गोरेवाडा येथे विद्यार्थ्यांना जैवविविधता संबंधित माहीती जीवशास्त्र प्रमुख प्रा. अमोल नैताम यांनी दिली. तर नागपूर येथे अवकाशीय तंत्रज्ञानासंबंधित व विद्युततांत्रिय गणितीय माहिती भौतिकशास्त्र प्रमुख प्रा. चंद्रशेखर बर्वे व गणित प्रमुख प्रा. हेरेकृष्ण सरकार यांनी दिली. संपूर्ण अभ्यासदौऱ्याचे नेतृत्व प्रा. प्रकाश म्हशाखेत्री यांनी केले तर विद्यार्थी व्यवस्थापन भूगोल विभाग प्रमुख प्रा. नरेश लाडे यांनी केले. सदर अभ्यास दौऱ्याची संकल्पना मांडणी व नियोजन इतिहास विभाग प्रमुख प्रा. मनीष राऊत यांनी तयार केले.

या अभ्यास दौऱ्यात विज्ञान व कला शाखेतील ७२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विद्यार्थीनीची व्यवस्था प्रा. कु. दीपाली चांदेवार यांनी बघितली. तर निखिल पाटील यांनी यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.