सहायक आयुक्त, समाजकल्याण गडचिरोली यांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि. २३ डिसेंबरः अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरीता शासनाने दि. 13 जुन 2018 च्या सुधारीत
शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणेकरीता विद्यार्थ्यांना वस्तीगृहात व स्वाधार योजनेचे लाभ घेणेकरीता विद्यार्थ्यांना वस्तीगृहात व स्वाध्याय योजनेचे अर्ज करणेकरीता एकच ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विदयार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राह्य धरले जावून नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीन वर अग्रेषित केले जातील. सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपूर्ण भरल्यास संबंधित अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी.
अर्ज करण्याकरीता ऑनलाईन पोर्टल-https://hmas.mahait.org हे असुन स्वाधार योजनेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे ऑनलाईन अर्ज करण्यात यावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
_________________________
सदर योजनेच्या ठळक निकषांमध्ये विद्यार्थी पात्र ठरत नसल्यास अश्या विद्यार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येईल. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000
फोटो साभार: गुगल









