चंद्रहास नंदनवार यांना भौतिकशास्त्रात आचार्य पदवी प्रदान

81

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली/चंद्रपूर: गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरीच्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी चंद्रहास मोतीलाल नंदनवार यांना “आचार्य पदवी” प्रदान करण्यात आली आहे.

त्यांच्या प्रबंधाचा विषय “लुमिनेस्संस स्ट्डी ऑफ़ लॅथनाइड डोप ऑर्थोफॉस्फेट फॉस्फर्स फॉर सॉलिड स्ट्रेट लाइटिंग” असा असून, त्यांनी हा प्रबंध डॉ. एन. एस. कोकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठास सादर केला होता.

संशोधनादरम्यान, डॉ. नंदनवार यांनी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्कोपस इंडेक्स जर्नल्समध्ये ३५ शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांचे एक पेटंट साउथ आफ्रिकामध्ये मंजूर, तर दोन पेटंट भारतात प्रकाशित झाले आहेत. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्कोपस-इंडेक्स जर्नल्समध्ये एक पुस्तक प्रकरण (Book Chapter) प्रकाशित केले आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे प्रकाशयोजना, प्रदर्शन तंत्रज्ञान आणि इतर ल्युमिनेसेन्स अनुप्रयोगांसाठी उपयुक्त अशा प्रगत फॉस्फर पदार्थांच्या विकासास महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.

कृतज्ञता व्यक्त करताना, डॉ. नंदनवार यांनी आपल्या मार्गदर्शक डॉ. एन. एस. कोकोडे, महाज्योती संस्था, नागपूर, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. एस. एम. शेकोकर, तसेच डॉ. डि. एच. गहाणे, डॉ. आर. एस. मेश्राम, डॉ. ए. एन. येरपुडे, प्रा. डी. एम. परशुरामकर, श्री. विलास खोब्रागडे आणि श्री. रोशन डांगे यांचे सततच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल, डॉ. नंदनवार यांनी आपल्या आई-वडिलांचे, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आणि गुरुजनांचेही मनःपूर्वक आभार मानले.