विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
वाघोली ( जिल्हा पुणे):जी. एच. रायसोनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाघोली, पुणे येथील रजिस्ट्रार सुजितकुमार कारंडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे दि. २५ जुलै २०२५ रोजी पी.एचडी प्रदान करण्यात आली.
त्यांनी “अ स्टडी ऑफ क्रिटिकल फॅक्टर्स इन इंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन विथ स्पेशल रेफरन्स टू सोलापूर युनिव्हर्सिटी” या विषयावर पीएचडी शोधनिबंध सादर केला.
त्यांना बी. पी. सुलाखे कॉमर्स महाविद्यालय बार्शीचे माजी प्राचार्य व सोलापूर विद्यापीठाचे कॉमर्स विभागाचे माजी अधिष्ठाता डॉ. एस. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
संशोधनामध्ये त्यांनी इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) प्रणालींच्या अंमलबजावणीत येणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करून शिक्षणसंस्थांमध्ये ERP लागू करताना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या उपाययोजना यांचा सखोल अभ्यास केला आहे.
श्री. कारंडे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनिल रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. आर. कुलकर्णी उपप्राचार्य डॉ. प्रवीण जांगडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.









