महात्मा गांधी विद्यालयात विविध संघ कार्यकारिणी गठीत

138

बहुसंख्य पालक उपस्थित 

विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): स्थानिक प्रथितयश महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरीता दिनांक १९ जुलैला शिक्षक पालकांच्या उपस्थित झालेल्या सभेत विविध संघाच्या कार्यकारिणींचे गठण करण्यात आले आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक -प्राचार्य साईनाथ अद्दलवार हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून गत शैक्षणिक सत्रातील शिक्षक पालक संघाचे (कनिष्ठ महाविद्यालय)उपाध्यक्ष उमेष हर्षे , विद्यालयाचे उपाध्यक्ष विलास गोंदोळे,उपप्राचार्य विलास आंबोरकर, उपमुख्याध्यापक विरेंद्र गुंफावार, पालक संघाचे दिवाकर ठाकरे,सौ.लठ्ठे आदी उपस्थित होते.

सर्व प्रथमतः जेष्ठ शिक्षक हेमंत निखारे यांनी शिक्षक पालक संघाचे वर्ष भरातील कार्य याबाबत विवेचन केले.उपप्राचार्य आंबोरकर यांनी भावी शैक्षणिक वाटचालीसाठी नियोजन याबाबत माहिती दिली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य अद्दलवार म्हणाले की,गत अनेक वर्षांपासून शिक्षक पालक संघाची स्थापना ही विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्या विकासासाठी तसेच समन्वयासाठी होत आहे.तीन शैक्षणिक सत्रातील सुरुवातीपासूनच शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शवित वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे.यावर्षीही दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.तीला प्रतिसाद मिळेल असा आशावाद व्यक्त केला.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक,शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यानंतर प्रथमतः महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील (कनिष्ठ महाविद्यालय)शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली.
यात पदसिद्ध अध्यक्ष म्हणून प्राचार्य साईनाथ अद्दलवार तर उपाध्यक्षपदी उमेष हर्षे, सचिव म्हणून विक्रांत मने, सहसचिव- प्रभाकर बेसुरकर,बालकदास कोटरंगे, महिला प्रतिनिधी म्हणून विद्या शंकर चौधरी आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

# महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय माता -पालक संघ कार्यकारिणी
यात पदसिद्ध अध्यक्ष म्हणून प्राचार्य साईनाथ अद्दलवार तर उपाध्यक्षपदी दुर्गा रविंद्र ठलाल, सचिव म्हणून प्रा.विद्या डहारे, सहसचिवपदी सौ.सुलोचना निरंजन कुलसंगे यांची निवड झाली.

# महात्मा गांधी विद्यालय शिक्षक- पालक संघ
यात पदसिद्ध अध्यक्षपदी प्राचार्य साईनाथ अद्दलवार तर उपाध्यक्षपदी विलास काशिनाथजी गोंदोळे, सचिव म्हणून शिक्षक हेमंत निखारे, सहसचिवपदी गणेश वकटूजी कांबळे, महिला प्रतिनिधी म्हणून सौ निशा विजय पेटकुले आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

# महात्मा गांधी विद्यालय माता -पालक संघ
यात पदसिद्ध अध्यक्ष म्हणून प्राचार्य साईनाथ अद्दलवार तर उपाध्यक्षपदी सौ.सरीता प्रशांत दडमल, सचिवपदी शिक्षिका प्रियंका डोंगरवार, सहसचिव सौ.शालू विलास भोयर आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक सत्र 2025 -26 या शैक्षणिक वर्षात शालेय बाबींमध्ये नेहमीप्रमाणेच हिरहिरीने सहभागी होत उच्च दर्जाचे शिक्षण व गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अडीअडचणीला सहकार्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक विरेंद्र गुंफावार यांनी केले.तर सुत्रसंचालन हेमंत निखारे व आभार प्रा.कानझोडे यांनी केले.

यशस्वीतेसाठी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी सहकार्य केले.