विविध क्षेत्रातील कर्तबगार विद्यार्थ्यांचा केला गौरव

106

संशोधक शंतनु राऊत यांचा विशेष सत्कार

गुरूकुल विद्यानिकेतन हायस्कूलचा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
देवळी (जिल्हा वर्धा): स्थानिक गुरुकुल विद्यानिकेतन हायस्कूल देवळी तर्फे शंतनू अशोकराव राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच जेष्ठ नागरीक सुभाष मोहता यांनीही या प्रसंगी शंतनू राऊतचा सत्कार केला.

यावेळी प्राचार्य योगेश ढोरे,सुभाष मोहता उद्योजक व समाजसेवक शरदराव आदमने, अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी देवळी, एकनाथ कांबळे, प्रा.दामोदर लांबट आदी उपस्थित होते.

शंतनू राऊत यांचे वडील अभियंता असून आई सुनीता गृहिणी आहे. इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ बोलोनिया विद्यापीठा मार्फत दरवर्षी जगभरातील युवा संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते. या फेलोशिप साठी निवड झालेला शंतनु भारतातील एकमेव संशोधक ठरला आहे.

याप्रसंगी प्राचार्य योगेश ढोरे व इतर मान्यवर यांच्या हस्ते मागील वर्षी तालुक्यातून प्रथम असलेला विद्यार्थी स्पंदन संजय अलोने, शाळेतून द्वितीय दिव्यानी विजय दयने, तृतीय सौंदर्या दिलीप फुलमाळी, चौथी नंदिनी प्रशांत दरणे व लीना यशवंत आंबटकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर प्रभावी कामगिरी करणारे क्रीडापटू आतिश रत्नाकर तुरक, राष्ट्रीय स्तरावर खेळणारा फुटबॉलपटू साहिल संदीप निरटकर यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच सांघिक खेळामध्ये विभागीय स्तरावर खेळणारे विद्यार्थी दिव्यक दयने, यथार्थ कडू, तेजस सावरकर, पयोज देवघरे, हार्दिक कामडी, अरहंत लांडगे, ओम जऊळकर, मानस जुडे, ऋग्वेद निवल, शिवम दुर्गे, आयुष कुमरे, तुषार कामडी, नमन खोडनकर, प्रथमेश सरदार, यश खडसे, राजवीर लोखंडे, संस्कार वानखेडे, सार्थक तिरकुल व सौरभ विश्वकर्मा यांचा मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन सौ. कल्पना गावंडे यांनी केले.तर आभार सौ. रोशना भांगे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.