विद्यार्थ्यांचा क्षेत्र भेट उपक्रम

130

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): स्थानिक श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या वर्ग नववी च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बर्डी शाखा आरमोरी येथे आस्थापना व बँकिंग प्रणाली याची माहिती घेण्याकरता शैक्षणिक क्षेत्र भेट नुकतीच दिली.

यावेळी वर्ग शिक्षक रविकांत मस्के,संगीत शिक्षक हेमंत खोब्रागडे तसेच बॅंकेच्या शाखा व्यवस्थापक सौ.निशा कोकोडे, लिपिक शुभांगी ताडेवार,मनिष कुंभारे, रोखपाल तेजपाल हेडाऊ व बॅंक कर्मचारी उपस्थित होते.

क्षेत्रभेटी प्रसंगी बॅंकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी अधिकोष,खाते व खात्यांचे प्रकार,दैनंदिन आर्थिक व्यवहार, बचत,मुदत ठेव,चालू खाते तसेच बचतीचे महत्त्व व काटेकोर आर्थिक नियोजन करून संपन्नता कशी निर्माण करता येईल या संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी बचतीचे धडे गिरवले व आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी अर्थ संपन्न होण्याचा निर्धार केला.