कल्पना चावला गाईड पथकाचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली),दि.८ सप्टेंबर २०२४: स्थानिक महात्मा गांधी विद्यालयातील कल्पना चावला स्काउट गाईड पथकाने प्राचार्य साईनाथ अद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली नजीकच्या रामाळा नदीपात्रातील परिसरात स्वच्छता करून जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
सद्यस्थितीत सर्वत्र सण उत्सवाचे वातावरण सुरू आहे.मात्र या उत्सवात फार मोठा प्रमाणात नागरीक घरातील पुजेचे साहित्य, निर्माल्य व इतर टाकावू पदार्थ बिनधास्तपणे नदीपात्रात टाकून अस्वच्छता निर्माण करीत असतात.यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित होत असते.तसेच याचे मनुष्य व प्राण्यांचे पेयजलावर विपरीत परिणाम होत असतात.ही बाब पर्यावरणाचा -हास करीत असते.यात मानवाचे नुकसान होत असते.
सदर बाबी संदर्भात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनींनी जेष्ठ शिक्षीका सौ.मीना मसराम व पथकाच्या गाईड प्रिती धाईत यांच्या नेतृत्वाखाली संबंधित परिसरात कच-याचे वर्गीकरण करून स्वच्छता केली.तसेच मनुष्य व प्राणी यांचेकरीता शुध्द पाणी साठे कसे सुरक्षित राहतील यासंदर्भात माहिती विशद केली.
सदर अभियानात शालेय सर्व गाईड उपस्थित होत्या.









