पिसेवडधा समूह साधन केंद्रांचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील समूह साधन केंद्र पिसेवडधाच्या वतीने श्री नामदेव दामाजी कुमरे यांचा कोरेगाव (रांगी) येथील जवाहर भवनात आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्तीपरांत सपत्निक सत्कार करण्यात आला.
श्री नामदेव कुमरे हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा पिसेवडधा येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होते.ते 31 जानेवारी 2024 ला सेवानिवृत झाले. श्री कुमरे यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानावर केंद्रातील शिक्षकांनी प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले.
‘समाजाने केलेला सत्कार हिच शिक्षकाची खरी कमाई असते’ असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष खुशाल बावणे यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमूख जीवन शिवणकर, सौ.मिराबाई कुमरे, पोलिस पाटील ओमप्रकाश मडावी, उपसरपंच गेमराज टेंभूर्णे, महेंद्र वैद्य, नरेंद्र मशाखेत्री, उमाकांत धकाते, प्रफुल मराठे, गुलाब मने यासह केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार मसराम यांनी केले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डंबाजी पेंदाम तसेच आभारप्रदर्शन किशोर पिंपळकर यांनी केले.
यशस्वीतेसाठी कोरेगाव (रांगी) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.









