जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२३ डिसेंबरः २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिवस” म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील जिल्हास्तरीय “राष्ट्रीय ग्राहक दिनाचा” कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता तहसिल कार्यालय, गडचिरोली येथील गोंडवाना कला केंद्र, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रदर्शन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.
0000









