आरमोरी येथे रेशीम दिन उत्साहात

50

विविध बाबींवर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.५ सप्टेंबर: राज्य शासनाने १ सप्टेंबर हा राज्य रेशीम दिन म्हणून घोषित केला
असून त्यानिमित्ताने जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी येथे दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी रेशीम दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास सहायक आयुक्त, जिल्हा मत्स्य विभाग श्री. डोंगरे, वैज्ञानिक डी.बी.एस.एम.टी.सी., भंडारा येथील श्री. गेडाम, स्वयंसेवी संस्थेचे संचालक श्री. चव्हाण तसेच जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. वासनिक उपस्थित होते.

तसेच जिल्ह्यातील टसर व तुती रेशीम उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमामध्ये टसर व तुती रेशीम उत्पादनासंबंधी अद्ययावत तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना व त्यांचा लाभ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोष बाजारपेठ, R.M.B. कोष खरेदी, वनक्षेत्रातील अडचणी, कोष धागाकरण इत्यादी मुद्यांवर उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा घेण्यात आली. शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले असून त्यांना अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी मागील हंगामात अधिक उत्पादन घेणाऱ्या आदर्श रेशीम शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच मत्स्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ तांत्रिक सहायक उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षेत्र सहायक विठ्ठले यांनी केले.

—————————————-
रेशीम उद्योगाच्या प्रोत्साहनासाठी तसेच शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, वडसा रोड, आरमोरी, जि. गडचिरोली (पिन-४४१२०८) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000——————————–