जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्म दिवस ‘२९ जून’ हा दिवस दरवर्षी” राष्ट्रीय सांख्यिकी दिन ” म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन २००७ पासून केंद्र शासनाने घेतला आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली येथे दिनांक २९ जून, २०२५ रोजी ज्ञानेश्वर बा. खडतकर, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली “राष्ट्रीय सांख्यिकी दिवस” साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात अध्यक्षांनी जेष्ठ सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या सांख्यिकी शास्त्रातील अनमोल योगदानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या “७५ Years of National Sample Survey” या विषयावर आणि प्राध्यापक महालनोबिस यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी उपयोजित अर्थशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सहायक प्राध्यापक डॉ. धैर्यशील खामकर, उपस्थित होते.
कार्यक्रमास जिल्हा सांख्यिकी कार्यालय गडचिरोली, जिल्हा नियोजन समिती तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालयतील जिल्ह्यातील विविध विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील वनकावार, सहायक संशोधन अधिकारी यांनी केले. तर आभार गं. निखारे, अन्वेषक यांनी आभार मानले.
0000








