कोटगल येथे मत्स्यव्यवसाय योजनांचा केला जागर

63

मत्स्यव्यवसायीक संस्थाना केले साहित्य वाटप

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि. २७: नजीकच्या कोटगल (ता. गडचिरोली जि. गडचिरोली) येथे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राष्ट्रीय मत्स्य विकास प्लॅटफॉर्म नोंदणी (NFDP), किसान क्रेडिट कार्ड मत्स्य (KCC), प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना (PMKSSY), ई-श्रम योजना तसेच GAIS (अपघात गटविमा योजना), मासेमारी साधनांवर अर्थसाहाय्य व इतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांची माहिती देणारा जनजागृती कार्यक्रम दिनांक २६मे२०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमात स्थानिक मत्स्य व्यवसायिक तसेच कोटगल, मुरखळा, मुडझा, हिरापूर व येवली येथील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

————————————+
या कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विभागाचे समीर डोंगरे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गडचिरोली यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पाच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मासळी बीज, मासळी खाद्य, जाळी, क्रेट्स, बर्फ पेटी (Ice Box) आणि कॅनव्हास तंबू यांचे वाटप करण्यात आले.
———————-+—————-

या उपक्रमामुळे स्थानिक मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळणार असून ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीस मदत होणार आहे.

कार्यक्रमात मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली, तसेच NFDP पोर्टलवर प्रत्यक्ष नोंदणी व मार्गदर्शन देखील करण्यात आले. मत्स्य व्यवसायिकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मत्स्य विभागाचे अ.ज्ञा. सोनोन, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, योगेश रोकमवार, वरिष्ठ लिपीक, विनोद कुनघाडकर, कनिष्ठ लिपीक, राहुल मेश्राम, कनिष्ठ लिपीक, किशोर मोगरकर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, भुषण साखरे (मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी) आणि मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी आदींनी मोलाचे सहकार्य केले.

0000