राज्यकर सहआयुक्त विनोद गवई यांचे आवाहन
गडचिरोली येथे परिसवांद
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.२८: राज्यकर विभाग, कझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन व दि जनरल मर्चेट असोसिएन यांच्या संयुक्त विद्यमाने दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यकर सहआयुक्त चंद्रपूर विभाग विनोद गवई यांनी करदात्यांनी राज्यकर विभागाच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
राज्यकर सहआयुक्त, विनोद गवई यांनी उपस्थित करदाते व्यापारी, सनदी लेखापाल, लेखापाल, अॅडव्होकेट यांच्याशी जीएसटीबाबत संवाद साधला व उपस्थितांच्या शंकांचे साध्या व सोप्या भाषेत निरसन केले.
भारतभूषण डुमरे, राज्यकर अधिकारी यांनी उपस्थितांना अभय योजनेबाबत मार्गदर्शन केले, तसेच सदर योजना किती सुलभ आहे व व्यापाऱ्याच्या हिताची आहे हे उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी मंचावर भुषण शहाने, सहायक राज्यकर आयुक्त, गडचिरोली, दिलीप सारडा अध्यक्ष कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन व जनरल मर्चेट असोसिएशन चे अध्यक्ष रविभाऊ चन्नावार उपस्थित होते.
धानोरा, भामरागड, अहेरी, सिरोंचा एटापल्ली अश्या दुर्गम भागातून करदाते तसेच कर सल्लागार कार्यशाळेला हजर होते.
करदात्यांना करभरना करण्यास सुलभता यावी याकरिता शासनातर्फे जीएसटी अभय योजना 2024 राबविण्यात येत आहे. वित्तीय वर्ष 2017-18, 2018-19, 2019-20 करिता जे प्रलंबित प्रकरणे आहेत याकरिता दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत फक्त कराचा भरणा केल्यास त्यावर लागणारी व्याज व दंड माफ करण्यात आले आहे. सदर योजना ही अतिशय लाभदायक आहे.
या कार्यक्रमाला याशिल भडके, विकास जक्कुलवार, रविंद्र मिसाळ सर्व राज्यकर अधिकारी गडचिरोली तसेच बंडावार अॅड. अजिक्य धात्रक, अॅड. मंगेश भरडकर, आनंद स्वामी, अॅड सुजित मुजुनदार, प्रविण मलंग, दिपक रामनानी आदी करसल्लागार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन निखिल मोरे, राज्यकर अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद सारडा, सनदी लेखापाल यांनी केले.
0000