्उपवनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली वनविभागाचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.१४:उपवनसंरक्षक (प्रादे.) गडचिरोली वनविभाग गडचिरोली अंतर्गत गोंडवाना हर्ब्स प्रकल्प येथे दिनांक १५,१६ व १७ फेब्रुवारी२०२५ ला वनौषधी शिबीराचे आयोजन केले आहे.
त्या अनुषंगाने औषधी वनस्पती मंजुर एम.एस. पी. दराने खरेदी करण्यात येत आहे. करीता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामधील ग्रामसभा, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत जनतेने नमूद केलेली आवश्यक वनौषधी व्यवस्थितरित्या संकलन करुन उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांचे परिसरातील गोंडवाना हर्ब्स प्रकल्पामध्ये सदर तारखेला उपस्थित राहावे. यावेळी विक्री पोटीची रक्कम आर. टी.जी.एस. व्दारे अदा करण्यात येईल.त्याकरीता सोबत बैंक पासबुक व छायांकित प्रत सोबत आणावे.असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनौषधींची यादी
—————————————
अ.–वनौषधीचे नाव–दर(MSP)
—————————————-
१)सफेद मुसळी–१३०
२) शतावरी -१००
३) अश्वगंधा -६०
४) मेहंदी -२५
५)भृगराज –४०
६) जलब्राम्ही –४०
७)मालकांगोनी बी–१२०
८)कंठकारी –२०
९) शहद –२३०
१०) सावरफुल -३०
११)पुनर्नवा –३०
१२)कुटज साल -३५
१३)काळी मुसळी –८०
१४)सफेद तीळ–१६०
१५)काळा तीळ –१५०
१६)गुडमार–४५
१७)सत्यानाशी–३०
१८)बेल–३५
१९)बला –१८
२०)भुईआवळा –
२१) आवर्तनी– ३५
२२) नागरमोथा –३५
२३)पळसफुल –
२४)एरंडी बी–४०
२५)कवच/केवांच बीज –३०
२६)मोहाफल–३५
२७)तुळस –२५
२८)जांभुळ/जांभुळ बी–४२
२९) अडुळसा–
३०)गोखरु –६०
३१) कडूनिंब पान–२५
३२)शरपुंखा —
३३)निर्गुडी–२५
३४)खस–५५
३५)कालमेघ –४०
३६) वावडिंग –९०
_____________________
गुणवत्तापूर्ण वनौषधींची एमएसपी दराने होईल खरेदी
यावेळी खरेदी करावयाच्या वनस्पतीची पडताळणी गोंडवाना हर्ब्सच्या तज्ञाकडुन करण्यात येईल व योग्य माल खरेदी करुन अनुचित माल घेतल्या जाणार नाही. मालाच्या गुणवत्तेनुसार एम एस.पी. दराने माल खरेदी करण्यात येईल. त्यासंबंधी गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाच्या तज्ञांचा निर्णय अंतिम असेल. असे वनपरिक्षेत्र अधिकारी मुख्यालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000