विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.०४: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय, गडचिरोली अंतर्गत थेट कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील लाभार्थींकरीता कर्ज वितरित केले जाणार आहे.
अनुसूचित जातीतील मांग/मातंग/मादगी/मादीगा व या समाजातील बारा पोट जातीतील लाभार्थी करीता उद्दिष्ट प्राप्त झालेले असून इच्छुक लाभाध्यांनी २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे प्रत्यक्ष येऊन रीतसर अर्ज सादर करावे, लाभार्थाशिवाय इतर व्यक्ती कडून अर्ज स्विकारण्यात येणार नाही. महामंडळास प्राप्त उद्दिष्टाच्या अधीन राहून थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येतील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, कर्ज प्रकरण १.०० लक्ष च्या मर्यादित मंजूर करण्यात येईल.
सदर योजनेतील अटी व शर्ती व अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेच आंबेडकर सामाजिक न्याय भवन आय.टी.आय. चौक. एल. आय. सी. रोड, गडचिरोली या पत्त्यावर संपर्क साधावा.असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.
0000