विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२०: जिल्हयातील गोशाळांना आर्थीकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता सन २०२४- २५ पासून देशी गाईचे संगोपनासाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे.त्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील सदर योजनेची निकष पूर्ण करणाऱ्या गोशाळा संचालकांकरीता अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
🐄पात्रता व अनुदान
सदर गोशाळेत ठेवण्यात येणा-या देशी गायींना रु. ५०/- प्रतीदिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबवीण्यास शासन मान्यता प्राप्त आहे.या योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्हयातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.
💻अर्ज करण्याची अंतिम तारीख, संकेतस्थळ व वेळापत्रक
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आहे. सदर योजनेचे उद्देश व स्वरुप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती योजनेची अंमलबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगीक कागदपत्रे इ. सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व http://schemes, mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे १६ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४,
गोसेवा आयोग मार्फत प्राप्त अर्जाची प्राथमीक तपासणी ०१ जानेवारी २०२५ ते १० जानेवारी २०२५.
जिल्हा गोशाळा पडताळणी समीती व्दारा प्राथमीक तपासणी श्रुती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी ११ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनांची संख्या आयोग कार्यालयास कळवीणे २१ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५.
तरी जिल्हयातील ईच्छुक गोशाळा यांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ . विलास गाडगे यांनी केले आहे.
0000








