विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली,दि.२०: दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय ग्राहक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील “राष्ट्रीय ग्राहक दिनाचा” कार्यक्रम दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रदर्शन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे व जनजागृतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








