अबब…!११११ किलोचा पौष्टिक नाचणी शिरा!

135

विलास गोंदोळे
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली, दि. ८ फेब्रुवारी २०२६

गेल्या ४-५ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली येथे विविध कृषी विभागाच्या वतीने कोया कृषी कुंभ २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.यात काल दिनांक ८ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त शेफ विष्णू मनोहर यांनी महाकाय अन्नपात्रात तब्बल ११११ किलो चा पौष्टिक नाचणी शिरा तयार केला होता.या आरोग्यदायी मेजवानी ‘शिरा’चे प्रदर्शनीत येणाऱ्या दर्शकांना कृषी विभागातील कर्मचारी यांचे हस्ते शिस्तबध्द व स्वयंसेवी पध्दतीने वितरण करण्यात आले.

शहरी भागातील विक्रमाप्रमाणेच आदिवासीबहुल व दुर्गम भागात हाही एक स्तुत्य उपक्रम कोया कृषी कुंभ च्या निमित्ताने कृषी विभागाने राबविला व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी आस्वाद घेतला. या जागतिक पटलावर नोंद झालेल्या विक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

—————————————-

मिलेट (भरडधान्य) या अधिक पोषणमूल्य असलेल्या धान्यांचा नागरिकांनी रोजच्या आहारात समावेश करावा.तसेच शेतकरी वर्गानी अधिकाधिक उत्पादन घ्यावे.असे आवाहन जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
————————————–
________________________

📄विविध बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली नोंद
गडचिरोलीत बनविलेल्या सुमधुर ,आरोग्यदायी, चविष्ट,पौष्टिक ‘शिरा’ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये घेतली गेली आहे.तसेच सदर संस्थांच्या उपस्थित प्रतिनिधींनी कृषी विभागाला प्रमाणपत्र बहाल केले.हे विशेष!
—————————————-_______________________
यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी एम.अरुण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी, शेतकरी, नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
————————————–