जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त यांचे आवाहन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि. ०५ सप्टेंबर: जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. या स्पर्धेत २३ वर्षाखालील तरुणांना आपली कौशल्ये सादर करण्याची सुवर्णसंधी मिळते.आगामी ४८ वी जागतिक कौशल्य स्पर्धा चीनमधील शांघाय येथे दिनांक २२ ते २७ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
यासाठी देशपातळी पर्यंतची निवड प्रक्रिया जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पार पडणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नावे थेट जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पॉलिटेक्निक कॉलेज, कौशल्य प्रशिक्षण संस्था, व्यवसाय प्रशिक्षण संस्था, फाईन आर्ट्स कॉलेज तसेच विविध महाविद्यालयांतील इच्छुक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी https:/skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन Learner / Participant या पर्यायाद्वारे आपली नोंदणी करावी.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
0000









