ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

104

देशात सात दिवसांचा दुखवटा

आजचे शासकीय कार्यक्रम रद्द

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून एक नवा आयाम प्राप्त करून देणारे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना गुरूवारी (दिनांक २६डिसेंबर,२०२४) रात्री दिल्लीच्या एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; त्यादरम्यान त्यांचे निधन झाले.९२ वर्षीय डॉ.मनमोहन सिंग यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता.त्यामुळे त्यांना एम्स रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचे गव्हर्नर,अर्थमंत्री ते पंतप्रधान अशा महत्वाच्या विविध पदांवर आत्यंतिक संयम,शांत, धीरगंभीर प्रवृत्ती, कर्तृत्ववान,मनमिळावू व ॠजू स्वभावाच्या गुणवैशिष्ट्यांमुळे कार्य केले..१९७१यावर्षी डॉ.मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम केले.तर १९७२ मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली गेली.त्यानंतर मनमोहन सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर अतुलनीय कार्य केले.

डॉ.मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ या काळात देशाचे अर्थमंत्री म्हणून काम केले होते.तसेच डॉ.मनमोहन सिंग यांनी २२मे २००४ रोजी तसेच २२मे २००९रोजी अशी दोनदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.या कालखंडात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय व उपाययोजना केल्या.यात१९९१ मध्ये उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार करून भारताला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढले.सेझ(SEZ )धोरण २००५ ने आयटी (IT )आणि आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली.माहितीचा अधिकार (RTI)२००५ने पारदर्शकता वाढविली.भारत-अमेरिका अणूकरार २००८ने भारताला आण्विक शक्ती म्हणून बळ दिले.तर२०१२मध्ये भारत पोलिओमुक्त केला.१०.०८ टक्के जीडीपी (GDP)वाढ साधून भारताच्या आर्थिक इतिहासात विक्रम केला.जगभरातील आर्थिक मंदीच्या झळा भारतीय अर्थव्यवस्थेला लागू नयेत यासाठी अनेक उपाययोजना केल्या.२७कोटी भारतीय लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले.शिक्षण हक्क कायदा २००९च्या माध्यमातून शिक्षणाची हमी दिली.जगातील तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अशाप्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांनी भरीव योगदान दिले.

मनमोहनसिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे.

—————————————-

*शोकसंदेश*
💐🙏💐
डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेषत्वाने भरीव योगदान देणारे संयमी व आर्थिक सुधारणावादी पर्व हरपल्याची खंत सदैव राहील.अशा महान व्यक्तीमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
✍️🎙️ विलास गोंदोळे
संपादक
विधायक दीपस्तंभ न्यूज 
————-

Previous articleआजचा दिवस ( दिनविशेष!)
Next articleआजचा दिवस ( दिनविशेष!)
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ